Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांचा बळीचा बकरा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar On Ajit Pawar : लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांचा बळीचा बकरा रोहित पवारांनी पुन्हा एका भाजपसह अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांना बळीचा बकरा बनवला जात असल्याची टीका रोहित पवारांनी केलीय. तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादा बळीचा बकरा बनवला जात असून येत्या कालात अजितदादांना वेगळं होण्यासाठी भाग पाडले जाईल असा दावा रोहित पवारांनी केलाय. दरम्यान भुजबळांसह अनेक आमदार आणि नेते अधिवशेनानंतर पक्ष सोडतील असा दावा रोहित पवारांनी केलाय. तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं तेव्हाच बोलायला हवं होतं.. असं सांगत बच्चू कडू यांनी निशाणा साधलाय.. विआ च्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या #चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत असून आधी #आरएसएस च्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे.