Goa Monsoon : वळपईत ढगफुटीसदृश्य पाऊस, गोव्यात परतीचा पावसाचा कहर
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP-Sharadchandra Pawar) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी गुंड सचिन घायवळच्या (Sachin Ghaywal) मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) लक्ष्य केले आहे, तर सांगोल्यात (Sangola) भाजप (BJP) नेते जयकुमार गोरेंच्या (Jayakumar Gore) वक्तव्यामुळे शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) अडचणीत आले आहेत. 'एका गुंडाला सहजपणे पासपोर्ट मिळतो... त्याला पाठबळ हे सत्तेतल्या लोकांचं लागतं,' असा थेट आरोप रोहित पवारांनी केला आहे. दुसरीकडे, '२०२९ मध्ये सांगोल्याचा आमदार भाजपचाच असेल' या जयकुमार गोरेंच्या विधानामुळे महायुतीत नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये (Jogeshwari) बांधकाम साईटवर झालेल्या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून मालक फरार आहे. तसेच, 'मनाचे श्लोक' हा वादग्रस्त चित्रपट हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे आता नव्या नावाने १६ ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement