Rohit Pawar on Devendra Fadnavis and Raosaheb Danve :रोहित पवारांचा फडणवीसांना टोला,दानवेंनाही चिमटा

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पाटील यांनी कर्जत-जामखेडमध्ये मतदारसंघ मिसळ खातानाचे फोटो ट्वीट करत जोरदार टोलेबाजी केली. रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये ३५ या अंकाचा विशेष उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे. ठाण्यात भाजपा नेत्यांचा असाच व्हिडीओ कौतुकाचा विषय होण्याऐवजी टीकेचा विषय ठरला होता. ठाणे स्टेशनबाहेरील गजानन वडापाव सेंटरमधील या व्हिडीओत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते वडापाववर ताव मारताना दिसले. मात्र, हे सर्व नेते आणि कार्यकर्ते तब्बल २०० वडापाव खाऊन पैसे न देताच निघून गेल्याचा आरोप झाला होता. यानंतर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी हॉटेल मालकाला पैसे अदा करत या वादावर पडदा टाकला होता.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram