Rohit Pawar Nomination Form | सपत्नीक घेतलं देवदर्शन, रोहित पवार कर्जतमधून उमेदवारी अर्ज भरणार
Rohit Pawar Nomination Form | सपत्नीक घेतलं देवदर्शन, रोहित पवार कर्जतमधून उमेदवारी अर्ज भरणार
कर्जत- जामखेड मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रोहित पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.... भल्या सकाळीच त्यांनी खर्डा या गावातील सद्गुरू संत सीताराम बाबा यांच्या समाधीचे सपत्नीक दर्शन घेतले... या वेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे औक्षण करण्यात आले...आमदार रोहित पवार आज कर्जत येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यानंतर दुपारी तीन वाजता कर्जत येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे... या सभेला खासदार अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत.