Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

Continues below advertisement

Rohit Pawar MPSC agitation Pune: महाराष्ट्र लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पाठवला आहे. मंगळवारी होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय न घेतला  गेल्यास पुणे शहर बंद पाडू, असा इशारा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिला आहे. गेल्या पाच दिवसांपासून रोहित पवार हे एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांसोबत पुण्यातील (Pune news) एस.एम जोशी पुलाजवळ सुरु असलेल्या आंदोलनात बसून आहेत. मात्र, आता राज्य सरकारने विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) यांचा राजीनामा तातडीने घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)

परवा संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता भीमनवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला आहे. पण मुख्यमंत्र्यांना राजीनामा पाठवून काही होणार नाही. भीमनवार यांनी आपला राजीनामा राज्यपालांना पाठवायला हवा होता. आता हा विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांना एकच भीती आहे की, आता जर भीमनवार यांचा राजीनामा घेतला तर उद्या सामान्य लोक कोणाचाही राजीनामा मागतील. उद्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामाही मागितला जाऊ शकतो. त्यामुळे आता हा सगळा खेळ इगोचा झाला आहे. भीमनवार यांनी राज्यपालांकडे देणे अपेक्षित होते. पण शेवटी मित्र सत्तेत आहे, मुख्यमंत्री आहे. त्यामुळे भीमनवार यांनी खेळी खेळली असावी. मी राजीनामा दिलाय, मी यात नाही, तुम्हाला मला वाचवायचं आहे. त्यांनी हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.  आजच्या कॅबिनेटममध्ये भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होईल. मुख्यमंत्र्यांनी त्यावर आज निर्णय घेतला नाही तर आम्ही पुणे बंद पाडू, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola