Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Sharad Koli Arrest सोलापूर: शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Shivsena UBT Sharad Koli) यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. MPDA कायद्यानुसार शरद कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्यामुळे शरद कोळी याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
शरद कोळीला अटक, एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय? (Sharad Koli Arrest)
आठवडाभरापूर्वीच शरद कोळी यांच्यावर MPDA कायद्यानुसार कारवाईचे आदेश जाहीर करण्यात आले होते. कारवाईचे आदेश जाहीर झाल्यापासून शरद कोळी फरार होते, मात्र काल सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कोळी यांना सांगलीतून ताब्यात घेतलं. शरद कोळीवर खंडणी मागणे, धमकी देणे सारखे जवळपास 9 गुन्हे दाखल असल्याने MPDA नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद कोळी याला एका वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.