Rohit Pawar Kusadgaon SRPF Center : SRPF प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन, रोहित पवारांना गेटवरच रोखलं
Rohit Pawar Kusadgaon SRPF Center : SRPF प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन, रोहित पवारांना गेटवरच रोखलं
अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्राचं लोकार्पण सोहळ्यावरून चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला...संबंधित प्रशासनाने आमदार रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण केंद्राच्या गेटवरच अडवल्याने हा गोंधळ उडाला...दरम्यान आम्हाला गेटवरच का अडवले याचे कारण या अहंकार सरकारलाच माहिती असावं... माझे इथले जे विरोधक आहेत(राम शिंदे) त्यांनी सागर बंगल्यावर त्यांच्या बॉसला फोन केला असावा आणि सागर बंगल्यावरच्या नेत्याकडूनच प्रशासनाला असा आदेश आला असावा की कर्जत जामखेड येथील स्थानिक लोकांना जे इथले भूमिपुत्र आहेत त्यांना आत जाऊ देऊ नका असं म्हणत रोहित पवार यांनी आज झालेल्या गोंधळावरून सरकारवर आणि देवेंद्र फडणवीस तसेच राम शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले...आम्हाला केवळ ही वास्तू बघायची होती ती बघू दिली नाही याचा आम्ही निषेध करतो असं पवार म्हणाले. बाईट- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी (SP) *रोहित पवार ऑन कुसडगाव सेंटर 2* Anc- कुसडगाव येथील SRPF केंद्राच्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा इतर सत्ताधाऱ्यांना निमंत्रण नसल्याबाबत विचारले असता आम्ही प्रशिक्षण केंद्राच्या आत कार्यक्रम घेतलाच नाही...आम्ही या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी परवानगी मागितली पण आम्हाला परवानगी नाकारण्यात आली...मी अनेक काम माझ्या मतदारसंघात मंजूर करून आणली त्याचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस आणि माझ्या विरोधकांनी केली देखील नाहीत...आज आम्ही जे केलं तो आमचा हक्क होता असं रोहित पवारांनी म्हंटले आहे. *रोहित पवार ऑन राम शिंदे बॅनर* Anc-आ. रोहित पवारांनी आयोजित केलेल्या कुसडगाव येथील SRPF प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आ.राम शिंदे यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर प्रतिक्रिया देताना आमच्या विरोधात जो पक्ष आणि नेते आहेत तो पक्ष फुसका पक्ष आहे...त्यांना केवळ हवेत फुसक्या मारायला जमत अशी टीका केली आहे...ज्या गोष्टींच श्रेय घ्यायला जमत नाही त्या गोष्टींच श्रेय घेण्याचा प्रयत्न तुम्ही का केला, तुमच्यात एवढी हिम्मत असेल तर जीआरवर बोला असं आव्हान रोहित पवारांनी विरोधकांना दिलं आहे.