Hingoli Soyabean Loss due to Rain : परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनचे नुकसान
abp majha web team
Updated at:
27 Sep 2024 09:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli Soyabean Loss due to Rain : परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनचे नुकसान
हिंगोली जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसापासून जोरदार पाऊस बरसतोय या पावसाने शेतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सध्या सोयाबीन काढणीची वेळ आहे यामुळे अनेक ठिकाणी शेतात सोयाबीन कापून टाकले आहे ते सोयाबीन पावसात भिजले आहे जिल्ह्यातील सावळी गावातील शेतकरी भास्कर आघाव यांच्या शेतातील तीन एकर वरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे 80 हजार रुपये खर्च करून शेतातील सोयाबीनचे पिक आघाव यांनी जोपासले होते दोन दिवसापूर्वी सोयाबीन कापणीची सुरुवात केली परंतु जोरदार पावसामुळे कापलेल्या सोयाबीनच्या सुड्या शेतात भिजत आहेत सतत पाऊस पडत असल्याने सोयाबीन ला मोड यायला सुरुवात झाली आहे.