Rohit Pawar ED Inquiry  : बलाढ्य शक्तीविरोधात आवाज उठवल्यानं कारवाई - रोहित पवार

Continues below advertisement

Rohit Pawar ED Inquiry  : बलाढ्य शक्तीविरोधात आवाज उठवल्यानं कारवाई - रोहित पवार 

रोहित पवार सुळेंच्या पाया पडल्या रोहित पवारांची आज ईडी चौकशी; बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी प्रश्नांची सरबत्ती, शरद पवार गटाचं शक्तिप्रदर्शन बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवारांची आज ईडी चौकशीशरद पवार गट शक्तिप्रदर्शन करणार, तर चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar ED Inquiry : मुंबई : आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांची आज ईडी (ED) चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार (Sharad Pawar) दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. दरम्यान, चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. त्याशिवाय कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू होती. पण त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं नव्हतं. तसेच, मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय, त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं रोहित पवारांकडून वारंवार सांगितलं जात होतं. त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींवर रोहित पवार काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram