Rohit Pawar Special Report : ईडी चौकशी रोहित पवारांची; राळ आरोपांची
Continues below advertisement
Rohit Pawar Special Report : ईडी चौकशी रोहित पवारांची; राळ आरोपांची बारामती अॅग्रो कथित घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांची ईडीने तब्बल 12 तास चौकशी केली. पुन्हा 1 फेब्रुवारीला रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे..
ईडी कार्यालयातून बाहेर आलेल्या रोहित पवारांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. रोहित पवारांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतलं आणि ईडीच्या बाजूला असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडले... मला कुणासमोर वाकणं आवडत नाही, बापमाणूस माझ्या मागे आहे.. एखादा कार्यकर्ता लढत असताना पवार त्याच्या मागे राहतात, ते पळणाऱ्यांच्या मागे राहत नाही असा टोला यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांना लावला..
Continues below advertisement