Rohit Pawar ED Case | रोहित पवार PMLA कोर्टात हजर, चार्जशीटमध्ये चुकांचा दावा
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार विशेष पीएमएलए कोर्टात हजर झाले. सुनावणीला सुरुवात झाली आहे. रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे व्यावसायिक भागीदार राजेंद्र इंगवले यांनाही न्यायालयाने समन्स बजावले होते. जून महिन्यात रोहित पवार, इंगवले आणि बारामती अॅग्रो यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी रोहित पवार यांची ईडीकडून दोन वेळा चौकशीही झाली आहे. सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळेही आज कोर्टात उपस्थित आहे. या संदर्भात रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. 'माझं नाव एफआयआर मध्ये नसताना सुद्धा मला ईडीचं समन्स आलं होतं. मी तिथे गेलो, चर्चा केली, सगळे डॉक्युमेंट्स दिले. त्यांनी जी चार्जशीट फाईल केली, त्यात बऱ्याच चुका आहेत. मूळ एफआयआरमध्ये माझं नाव नाही. अजित दादा, मुश्रीफ, माणिकराव कोकाटे अशी पंच्याहत्तर लोकांची नावे आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही, पण एफआयआरमध्ये नाव नसतानाही माझ्यावर तपास सुरू आहे,' असे त्यांनी सांगितले.