Rohit Pawar On Ajit Pawar : कूर्डू प्रकरणात अजित पवारांची मीडिया ट्रायल, रोहित पवार म्हणाले...

Continues below advertisement
कुडूगावामध्ये आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी प्रकरणात रोहित पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांची पाठराखण केली आहे. रोहित पवारांनी म्हटले आहे की, अजित पवारांची मीडिया ट्रायल सुरू आहे. मित्र पक्षाच्या नेत्यांची मीडिया ट्रायल घेण्याऐवजी राज्याच्या नेतृत्वाने शेतकरी प्रश्न, युवकांचे प्रश्न, महिला सुरक्षा आणि भ्रष्टाचार यावर लक्ष केंद्रित करावे असे रोहित पवारांनी सांगितले. कुडूकाबात आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका योग्य होती असे त्यांचे मत आहे. "घोळ दादांच्या हिंदीमुळे आणि शैलीमुळे झाला," असे रोहित पवारांनी स्पष्ट केले. सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मित्र पक्षांच्या नेत्यांची मीडिया ट्रायल करण्यापेक्षा राज्यातल्या प्रश्नांची मीडिया ट्रायल करावी असे आवाहन त्यांनी केले. राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना, पक्षाच्या दोन-तीन नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्र पक्षाला प्रो भूमिका घेतल्याचे रोहित पवारांनी नमूद केले. आपल्या पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola