Morning Prime Time News : 8 AM : Maharashtra News : 17 OCT 2025 : मॉर्निंग प्राइम टाईम : ABP Majha

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत चक्क अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं बनावट आधार कार्ड तयार करून दाखवलं आहे. 'बोगस आधारकार्ड वापरुन बोगस मतदार तयार करण्यात आल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे'. त्यांनी भाजपचे देवांग दवे (Devang Dave) यांच्यावर मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, दिवाळीनिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हजेरी लावणार आहेत. बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात आज ओबीसी महायलगार सभा होत आहे. तसेच, सामनाच्या अग्रलेखातून डीएमकेच्या (DMK) हिंदी विरोधी भूमिकेवर टीका करण्यात आली आहे, पण भाजपवरही (BJP) हिंदी विरुद्ध इतर असा वाद पेटवण्याचा आरोप केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola