Maharashtra Politics: 'कार्यकर्ते वेगळं बोलतायत', Ajit Pawar यांचे स्वबळाचे संकेत, महायुतीत फूट?

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे महायुतीमध्ये (Mahayuti) खळबळ उडाली आहे. पुणे येथे बोलताना अजित पवार म्हणाले, 'निवडणुका जश्या जवळ यायला लागल्यात तसं वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे बोलायला लागलेले आहेत'. राज्यात भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचे महायुतीचे सरकार असले तरी, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि 'इलेक्टिव्ह मेरिट' म्हणजेच निवडून येण्याची क्षमता पाहूनच उमेदवार ठरवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आधी महायुती म्हणून निवडणुका लढवण्यावर एकमत झाले होते, पण आता स्थानिक मतप्रवाहानुसार निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola