Rohit Patil News : अजितदादांचा फोन आला होता का? रोहित पाटील स्पष्टच बोलले..
Rohit Patil News : अजितदादांचा फोन आला होता का? रोहित पाटील स्पष्टच बोलले..
राज्यातील फडणवीस सरकारचं पहिल विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं असून पहिल्याच दिवशी ईव्हीएमच्या (EVM) मुद्दयावरुन विरोधकांनी विधानसभा परिसरात गोंधळ घातला. तर, महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांनी शपथविधीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं फोनवर बोलणं झाल्यानंतर या आमदारांनी शपथ घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शरद पवारांनी आज कोल्हापुरातून पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी, सत्ताधारी पक्षाला ईव्हीएमवरुन टोला लगावत काही आकडेवारी देखील मांडली. पण, ईव्हीएमवर आत्ताच बोलणं हे योग्य नसल्याचंह ते म्हणाले. त्यानंतर, मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही आकड्यांना आकड्यांनीच उत्तर देत शरद पवारांना (Sharad pawar) प्रत्युत्तर दिलं. तसेच, पवार साहेब तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.