ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 December 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 06 PM टॉप हेडलाईन्स 06 PM 08 December 2024
पराभव स्वीकारायला हवा... विधानसभेतल्या मतांच्या आकडेवारीवर बोट ठेवणाऱ्या पवारांना मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन; तर रडगाणं बंद करा, उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला
मतदारांना संशय असताना ईव्हीएमचा हट्ट का? मारकडवाडीत पोहोचलेल्या शरद पवारांचा निवडणूक आयोगाला प्रश्न, गावातील जमाबवंदीवरूनही प्रशासनाला सवाल
पवारांनी या वयात नौटंकी करू नये, मारकडवाडीच्या मतदानाचा पॅटर्न जाहीर करत बावनकुळेंचं टीकास्त्र, तर पडळकर-खोत जोडीचा ईव्हीएम समर्थनात विधानभवनात ठिय्या
मुंबई ओरबाडली जात असताना षंढ म्हणून गप्प बसणार का? उद्धव ठाकरेंचा आसूड; दिशा आणि हेतू नसलेल्या पक्षात कार्यकर्त्यांना किंमत नाही, नाव न घेता मनसेवर हल्लाबोल'
अबू आझमी भाजपची बी टीम, आदित्य ठाकरेंकडून ठपका, लोकसभेत ठाकरेंसाठी केेलेला प्रचार विसरलात का? सपाच्या रईस शेख यांचा प्रतिसवाल
संजय राठोड आणि अब्दुल सत्तारांना डच्चू मिळण्याची शक्यता; एकनाथ शिंदेंनी मांडलं आमदार आणि मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक... सरनाईक, खोतकर, गोगावले यांचं मंत्रिपद जवळपास निश्चित