Rohit Arya Encounter प्रकरणात हायकोर्टात याचिका, पोलिसांच्या नार्को टेस्टची मागणी

Continues below advertisement
रोहित आर्य (Rohit Arya) एन्काउंटर प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचले असून, माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. वकील नितीन सातुते (Nitin Satpute) यांनी दाखल केलेल्या याचिकेत, 'या प्रकरणात गुन्हा दाखल करा आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) वर्ग करून पोलिसांची नार्को टेस्ट (Narco Test) करा,' अशी मागणी करण्यात आली आहे. रोहित आर्य याने १७ मुलांना ओलीस ठेवल्यानंतर पोलीस चकमकीत त्याचा मृत्यू झाला होता. हे एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप याचिकेत आहे. घटनेच्या दिवशी पोलिसांनी केसरकर यांना आर्यसोबत बोलण्याची विनंती केली होती, मात्र आपण आता मंत्री नसल्याने संबंधित अधिकारी आश्वासन देऊ शकतील, असे सांगत केसरकर यांनी बोलण्यास नकार दिला होता, अशी माहिती समोर आली आहे. आर्यने राज्य सरकारवर फसवणुकीचा आरोप केला होता आणि त्याचे काही पैसे सरकारकडे थकल्याचा दावा करण्यात आला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola