Powai Hostage Crisis:रोहित आर्यचे सरकारशी काय संबंध होते?
Continues below advertisement
पवईमधील (Powai) स्टुडिओत १७ मुलांना ओलीस धरणारा चित्रपट निर्माता रोहित आर्या (Rohit Arya) याचा पोलिसांच्या कारवाईत मृत्यू झाला आहे. 'स्वच्छता मॉनिटर' (Swachhata Monitor) या सरकारी योजनेचे पैसे थकवल्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. 'वारंवार पत्र लिहूनही सरकारनं दखल घेतली नाही', असा आरोप करत आर्याने निराशा व्यक्त केली होती. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आता पुढील तपासासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. 'स्वच्छता मॉनिटर' प्रकल्पाच्या जानेवारी २०२४ च्या जीआरमध्ये रोहितचं नाव होतं आणि यासाठी सुमारे २०.६३ कोटींचं बजेट होतं. पैसे थकल्याने त्याने शिक्षण विभागाला पत्र लिहिलं, उपोषण केलं आणि तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची भेटही घेतली होती. मात्र, आश्वासन देऊनही पैसे न मिळाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, ज्यानंतर आता या योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement