Hawa Mahal Files: 'खंडणीच्या पैशातून Bachchu Kadu नी हवा महल उभारला', BJP आमदार Pravin Tayde यांचा गंभीर आरोप.

Continues below advertisement
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर भाजप आमदार प्रवीण तायडे (Pravin Tayde) यांनी गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे 'हवा महल' (Hawa Mahal) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'समाजसेवेचं सोंग आणून खंडणीच्या पैशातून बच्चू कडूंनी हवा महल उभारला आहे', असा थेट आरोप प्रवीण तायडे यांनी केला आहे. तायडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. अमरावतीच्या कुरळपूर्णा येथे असलेल्या ७२ एकरच्या परिसरातील या 'हवा महल'साठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने आणि अल्पदरात बळकावल्याचा आरोपही तायडे यांनी केला आहे. बच्चू कडू यांनी पदाचा गैरवापर करून अवैध पैसा वापरल्याचा दावाही या पत्रात करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola