Mumbai Hostage Crisis: 'हे एक स्वप्नच राहणार आहे', प्रत्यक्षदर्शी Rohan Dinesh यांनी सांगितला संपूर्ण थरार

Continues below advertisement
पवई येथील ओलीस नाट्याचे (Powai Hostage Crisis) साक्षीदार रोहन दिनेश (Rohan Dinesh) यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत संपूर्ण थरारक घटनाक्रम सांगितला आहे. 'हे आता एक स्वप्नच राहणार आहे', अशा शब्दात त्यांनी आपली भीती व्यक्त केली. आरोपी रोहित आर्याने (Rohit Arya) 'करप्शन थांबवण्यासाठी मुलं क्रांती घडवतील' अशी चित्रपटाची खोटी कथा सांगून सर्वांना फसवले, असे दिनेश यांनी सांगितले. या ऑडिशनला विश्वासार्हता देण्यासाठी गिरीश ओक, उर्मिला कोठारे आणि रुचिरा जाधव यांच्यासारखे सेलिब्रिटीही येऊन गेले होते, असा मोठा खुलासा त्यांनी केला. जेव्हा रोहन यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा रोहित आर्याने त्यांच्या चेहऱ्यावर पेपर स्प्रे मारला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने आपण मुलांना बाहेर काढण्यास कशी मदत केली, याची माहितीही रोहन दिनेश यांनी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola