Ratnagiri: कोकणकिनारे पुन्हा पर्यटकांनी गजबजले; पर्यटन व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर ABP Majha
लॉकडाऊनमुळे अनेक महिने राज्यातील पर्यटनस्थळं बंद होती. परंतु आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने देखील पर्यटन उद्योगाला दिलासा दिला आहे. याचा उत्तम नमुना म्हणजे कोकणात येणारे पर्यटक. पर्यटकांची पाऊलं पुन्हा कोकणाकडे वळू लागली आहेत आणि काही दिवसांपासून कोकणाचे समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत. त्यात आज पासून प्रार्थनास्थळं देखील सुरू करण्यात आली आहेत आणि हा निर्णय ही कोकणाच्या पर्यटन व्यवसायाला नक्कीच फायदेशीर ठारणार आहे.