Rihanna at Ambani Wedding : तीन वर्षांपूर्वी अंबानींवर टीका..आज त्यांच्या मुलाच्या विवाहात हजेरी

Continues below advertisement

आता बातमी देशातीलच नव्हे तर जगातील बहुचर्चित प्री वेडिंग सोहळ्याची.. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा हा विवाहपूर्व सोहळा अर्थात प्री वेडिंग सोहळा आहे. या सोहळ्यात सगळ्यात महत्वाची पाहुणी आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहाना.. आपल्याला आठवत असेल तीन वर्षांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना तिने पाठींबा दिला होता, तिच्या एका ट्विटमुुळे आंदोलनाच्या आगीत आंतरराष्ट्रीय तेलाचं काम केलं होतं. मोदी सरकार अदानी-अंबानींचं हित बघतंय असा आरोप करत शेतकऱ्यांनी अंबानींच्या जिओच्या दिड दोन हजार टॉवर्सची तोडफोड केली होती.. आज तिच जगप्रसिद्ध रिहाना भारतात आली आहे. शेतकऱ्यांसाठी नाही तर मुकेश अंबानींच्या मुलाच्या प्री वेडिंगमध्ये परफॉर्म करायला ती जामनगरमध्ये पोहोचली आहे. याला काळाचा महिमाच म्हटलं पाहिजे, याचं वर्णन वेगळ्या प्रकारे करणार की कसं असं मत अनेक जण व्यक्त करतायेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram