OBC vs OBC : 'तुम्ही वारंवार भूमिका बदलू नका', Chhagan Bhujbal यांचा थेट Vijay Wadettiwar यांना इशारा
Continues below advertisement
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांच्यात मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. 'वडेट्टीवार यांची भूमिका दुटप्पी असल्याचा गंभीर आरोप' छगन भुजबळ यांनी बीडमधील महायल्गार सभेत केला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी वडेट्टीवार करत असल्याचा आरोप करत, भुजबळांनी त्यांचा एक व्हिडिओ सभेत दाखवला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही वडेट्टीवार समाजाची दिशाभूल करत असल्याचे म्हटले आहे. यामुळे ओबीसी नेत्यांमध्येच एकी राहिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यात चष्म्यावरून शाब्दिक युद्ध रंगलं आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलं आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement