Maratha vs OBC: 'अंतरवालीच्या दरिंदे पाटलांमुळे अंतर पडलं', मंत्री Chhagan Bhujbal यांचा Jarange पाटलांवर हल्लाबोल
Continues below advertisement
मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी (OBC) आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर या अंतरवादीच्या दरिंदे पाटलांमुळे पडलं,' असा थेट हल्ला भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर केला. त्याचबरोबर, 'विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामधे विखार पसरवून गेला,' असा आरोपही त्यांनी विखे-पाटलांवर केला आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही मराठा आरक्षणाच्या जीआरवरून (GR) जरांगेंना लक्ष्य केले आहे. दुसरीकडे, आम्ही दुहेरी लढाई लढणार, एक न्यायदेवतेकडे आणि दुसरी रस्त्यावर कारण 'रस्ता तर आमच्याच बापाचा आहे', असा इशाराही भुजबळ यांनी दिला आहे. या वादामुळे अजित पवार (Ajit Pawar) गटात आणि सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement