MVA Politics: 'मी पत्र पाठवलेलं नाही', Harshvardhan Sapkal यांच्या तक्रारीच्या वृत्तावर Sanjay Raut यांनी सस्पेन्स संपवला

Continues below advertisement
मनसेच्या (MNS) महाविकास आघाडीतील (MVA) संभाव्य प्रवेशावरून राजकारण तापले असून, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांनी 'आमचं हायकमांड महाराष्ट्रात आहे, त्यांना केंद्रात विचारावं लागेल' असे म्हणत काँग्रेसच्या निर्णयप्रक्रियेवर टिप्पणी केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपकाळ यांच्या भूमिकेमुळे नाराज झालेल्या राऊत यांनी काँग्रेस हायकमांडकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, यानंतर संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ या दोघांनीही हे वृत्त फेटाळून लावले आहे. मनसेला आघाडीत घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि असा कोणताही तक्रारवजा पत्रव्यवहार झाला नसल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीत नव्या मित्राच्या समावेशापूर्वीच वादाची ठिणगी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola