MVA Tussle: मनसेच्या संभाव्य एन्ट्रीवरून महाविकास आघाडीत ठिणगी, Sanjay Raut यांनी फेटाळले तक्रारीचे वृत्त
Continues below advertisement
राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) मनसेच्या (MNS) संभाव्य प्रवेशावरून मतभेद उघड झाले असून संजय राऊत (Sanjay Raut) आणि हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्यातील वाद चर्चेत आहे. 'आमचा हायकमांड महाराष्ट्रात आहे, ते निर्णय घेतात,' असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेवर टीका केली आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला आघाडीत घेण्यास विरोध दर्शवल्यानंतर, राऊत यांनी थेट काँग्रेस हायकमांडकडे सपकाळ यांची तक्रार केल्याची चर्चा होती. मात्र, मनसेकडून असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे म्हणत राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. तर दुसरीकडे, मनसेसोबत जायचे की नाही याचा निर्णय पक्षाचे हायकमांड घेतील, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement