MVA-MNS Alliance: 'मोर्चाला कोण येणार हे महत्वाचं नाही', Harshvardhan Sapkal यांची नाराजी?
Continues below advertisement
महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) मनसेच्या (MNS) समावेशावरून काँग्रेसमध्ये (Congress) मतभेद असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी १ नोव्हेंबरच्या महाविकास आघाडी-मनसेच्या संयुक्त मोर्चाकडे पाठ फिरवली आहे. 'मोर्चाला कोण येणार बैठकीला कोण येणार हे महत्वाचं नाही', असे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. कौटुंबिक कारणांमुळे आपण मोर्चात सहभागी होऊ शकणार नसल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, MVA आणि मनसेच्या महत्त्वाच्या बैठकीलाही हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) अनुपस्थित होते. या बैठकीला काँग्रेसचे प्रतिनिधित्व सचिन सावंत आणि नसीम खान यांनी केले. मनसेला आघाडीत घेण्यास काँग्रेसचा आधीपासूनच विरोध असल्याने, वरिष्ठ नेत्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement