MVA Showdown: 'मोर्चाला कोण येणार हे महत्त्वाचं नाही', काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांच्या भूमिकेने सस्पेन्स वाढला
Continues below advertisement
महाविकास आघाडीच्या (MVA) नियोजित मोर्चावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) आणि शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात आज 'सामना' कार्यालयात होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'मुद्दा महत्त्वाचा आहे, मोर्चाला कोण येणार किंवा बैठकीला कोण येणार हे महत्त्वाचं नाही,' असे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. या बैठकीनंतरच सपकाळ मोर्चात सहभागी होणार की नाही, हे स्पष्ट होईल. काँग्रेस पक्षाने या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला असला तरी, खुद्द प्रदेशाध्यक्षांच्या सहभागाबद्दल अनिश्चितता असल्याने आघाडीतील समन्वयावर चर्चा सुरू झाली आहे. सपकाळ यांनी म्हटले आहे की, प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांनी मोर्चाला पाठिंब्याची भूमिका आधीच घेतली आहे, पण त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाचा निर्णय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीनंतरच होणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय घडते यावर मोर्चाचे भवितव्य अवलंबून आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement