Maharashtra Politics : धुळ्यात महायुतीत बिघाडी? 'जागावाटप न झाल्यास स्वबळावर लढू', शिंदे गटाचा इशारा
Continues below advertisement
धुळे जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपावरून आणि निवडणूक रणनीतीवरून महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. ‘जागावाटपात अपेक्षित स्थान न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली आहे.’ तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. याउलट, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे सर्व स्थानिक निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात पाच आमदार असल्याने महायुतीसाठी अनुकूल वातावरण असले तरी, घटक पक्षांमधील स्वबळाच्या घोषणेमुळे जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement