Pune Land Deal : 'दादांना कुणकुण लागली असती तर थांबवलं असतं', Ajit Pawar यांच्या बचावासाठी Vikhe Patil मैदानात
Continues below advertisement
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची एका वादग्रस्त जमीन व्यवहारावरून (Land Deal) पाठराखण केली आहे. 'दादांना व्यवहाराची कुणकुण लागली असती तर त्यांनी ते प्रकरण थांबवलं असतं,' असे महत्त्वपूर्ण वक्तव्य विखे पाटील यांनी केले. पुणे जिल्ह्यातील एका जमीन व्यवहारात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याशी संबंधित कंपनीचे नाव आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना विखे पाटील म्हणाले की, अजित पवारांच्या कामाच्या व्यापातून काही गोष्टी परस्पर घडल्या असतील. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, सत्य लवकरच समोर येईल, त्यामुळे कोणीही लगेच निष्कर्ष काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षांकडे दुसरा कोणताही मुद्दा नसल्याने ते राजीनाम्याची मागणी करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement