Thane Politics : 'अब की बार 70 पार', ठाण्यात BJP चा स्वबळाचा नारा; Mahayuti मध्ये उभी फूट?

Continues below advertisement
ठाण्यातील राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे तापले आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपने (BJP) स्वबळाचा नारा दिला आहे. भाजप आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) आणि इच्छुक उमेदवार अल्पेश कदम (Alpesh Kadam) हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी 'अब की बार ७० पार' ची घोषणा देत स्वबळाचा सूर आवळला आहे. ठाण्यातील भाजपच्या मॅरेथॉन बैठका आणि इच्छुकांच्या कार्यशाळेनंतर शहरात बॅनरबाजीला सुरुवात झाली आहे. 'ठाण्याचा विकास फक्त भाजपच करणार' अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. याआधी आमदार संजय केळकर यांनी 'महापौर आमच्यात बसेल' अशी इच्छा व्यक्त केली होती, ज्यामुळे शिंदे गटासोबतच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींमुळे ठाण्यात महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola