Diwali Firecrackers फक्त रात्री १० वाजेपर्यंत फटाके, Mumbai Police ची नियमावली; नियम मोडल्यास कारवाई
Continues below advertisement
दिवाळी २०२५ साठी मुंबई पोलिसांनी फटाके वाजवण्याकरिता नियमावली जाहीर केली आहे. या नियमांनुसार, दिवाळीच्या काळात मुंबईत नागरिकांना रात्री १० वाजेपर्यंतच फटाके वाजवण्याची परवानगी असेल. पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार, 'फटाके वाजवताना डेसिबलची मर्यादा पाळावी लागेल, अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे'. तथापि, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (२० ऑक्टोबर २०२५) नागरिकांना मध्यरात्री १२ वाजेपर्यंत फटाके फोडण्याची विशेष सूट देण्यात आली आहे. फटाक्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी डेसिबलची मर्यादा पाळणे बंधनकारक असून, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. मागील वर्षांमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हेही दाखल झाले होते, त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement