Chandrakant Patil यांच्याकडून पुणे पदवीधरसाठी महायुती उमेदवार म्हणून Sharad Lad यांच्या नावाची घोषणा

Continues below advertisement
पुणे पदवीधर मतदारसंघावरून (Pune Graduate Constituency) महायुतीमध्ये (Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजप (BJP) यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात या वादावर सूचक वक्तव्य केले. 'ताकाला येऊन भांडं लपवण्यात काय अर्थ आहे?' असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण लाड (Arun Lad) यांचे चिरंजीव शरद लाड (Sharad Lad) हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे घोषित केले आहे. शरद लाड यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याची माहिती आहे. पाटील यांनी जरी ही घोषणा केली असली, तरी अधिकृत निर्णय दिल्लीतून होईल असेही स्पष्ट केले, मात्र त्यांच्या या घोषणेमुळे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola