Thane Politics: 'अभी नही तो कभी नही', ठाण्यात भाजप आक्रमक, 'चप्पा चप्पा भाजपा'च्या घोषणेने महायुतीत तणाव
Continues below advertisement
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्येच मोठी राजकीय लढाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजप (BJP) आणि शिंदेच्या शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडल्याचे चित्र आहे. भाजपच्या बैठकीत 'अभी नही तो कभी नही, चप्पा चप्पा भाजपा', असा नारा देत स्वबळाची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे, खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या बैठकीतही पदाधिकाऱ्यांनी भाजपबद्दल नाराजी व्यक्त करत 'एकला चलो रे' चा सूर आवळला आहे. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये मोठी बिघाडी झाली असून, याचा फायदा नेमका कुणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement