Gujarat Politics: 'महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारी मंत्री', Sanjay Raut यांचा Gujarat बदलांवरून सरकारवर हल्ला

Continues below advertisement
गुजरातच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सरकारवर टीका केली आहे. 'महाराष्ट्रामध्ये इतके भ्रष्टाचारी मंत्री बसलेले आहेत आणि मुख्यमंत्री हतबल आहेत, असे बदल महाराष्ट्रात झाले तर स्वागतच होईल', असे संजय राऊत म्हणाले. गुजरातमध्ये उद्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असून या सोहळ्याला केंद्रीय नेते अमित शहा आणि जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. नवीन चेहऱ्यांमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि अर्जुन मोटवानिया यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाटीदार समाजाला आणि सौराष्ट्रातील नेत्यांनाही नव्या मंत्रिमंडळात विशेष स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola