Shivsena Vs BJP Buldhana : बुलढाण्यात युतीमध्ये बिघाडी, नगराध्यक्षपदावरून वाद पेटला

Continues below advertisement
बुलढाणा (Buldhana) येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि शिंदे गट (Shinde Gat) यांच्यात संघर्ष पेटला आहे. आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे (Vijay Shinde) यांच्यात नगराध्यक्षपदावरून जुंपली आहे. 'युती झाली पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काल दीड कोटी रुपयांची डिफेंडर आणली, ती कोणत्या कामातील कमिशनमुळे मिळाली याची चौकशी व्हावी', असा गंभीर आरोप करत विजय शिंदे यांनी थेट आमदार गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. बुलढाण्यामध्ये शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचा दावा गायकवाड यांनी केला होता, ज्याला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बुलढाणा नगराध्यक्षपद भाजपकडे आल्यास तरच युती शक्य होईल, अन्यथा नाही, असा स्पष्ट इशारा विजय शिंदे यांनी दिला आहे, त्यामुळे महायुतीतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola