Anil Kumar Pawar Supreme Court : अनिलकुमार पवारांना दिलासा, सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले

Continues below advertisement
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार (Anil Kumar Pawar) यांना मोठा दिलासा दिला आहे. 'पवारांना इतक्या तत्परतेने अटक कशी झाली?' असा सवाल सुप्रीम कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाला (ED) विचारला आहे. पवार यांची अटक बेकायदेशीर ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ईडीने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र ही याचिका फेटाळण्यात आली. या प्रकरणी पुढील सुनावणी नोव्हेंबर 2025 मध्ये होणार आहे. अनिलकुमार पवार यांच्यावर 41 अनधिकृत बांधकामांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola