Retired Employees Protest : नाशिक आणि अमरावतीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक आणि अमरावतीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलंय. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ५० हून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी आंदोलन करत आहेत. तर तिकडे अमरावतीतही सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांनी आंदोलन केलंय... काल्पनिक वेतन वाढीचा फरक रोखीने अदा करावा, प्रगती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणीचा दुसरा लाभ मिळावा या मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे.