
Ramdas Kadam Allegations : रामदास कदम यांचा राजीनामा आणि टीकास्त्र ABP Majha
Continues below advertisement
माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिलाय. उद्धव ठाकरेंच्या कारभारावर टीका करत रामदास कदम यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय.
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर नेतेपदाला काहीच अर्थ नाही, असं राजीनामा देताना कदम यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कदम शिवसेनेत सक्रीय राजकारणापासून दूर होते. शिवसेनेतील बंडानंतर रामदास कदम यांचे पुत्र योगेश यांनी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रामदास कदम काय करणार याची उत्सुकता होती. आता शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देऊन कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
Continues below advertisement
Tags :
Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Criticism Leader Ramdas Kadam Former Minister After Death Shiv Sena Leader Resignation Party Leader Resignation Maha Vikas Aghadi Govt.