Sidhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खनिज उत्खननामुळे स्थानिकांना त्रास, आत्मदहन करण्याचा इशारा

Continues below advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावातील खनिज उत्खनना मुळे गावात अनेक प्रश्न उद्भवत आहेत. त्यामुळे कळणे वासियांनी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. पावसाळ्यात कळणे खनिज उत्खनना चा बंधारा फुटल्याने अनेक लोकांच्या घरात, शेतात, बागायतीत खनिजयुक्त पाणी घुसून हानी झाली. यावर त्या शेतकऱ्यांना ना कंपनीने ना शासनाने कोणत्या पद्धतीची मदत केली नाही. त्यामुळे कळणे खनिज उत्खनन बंद करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम असून खनिज उत्खनन पुनश्च चालू केल्यास आत्मदहन करू असा इशारा कळणे वासीयांनी दिला आहे. गेली अनेक वर्ष कळणे गावात खनिज उतख्तनांमुळे पाण्याचे दुष्परिणाम जाणवत आहेत. यावर आता कळणे वासीय एकवटले असून खनिज उतखननं प्रकल्पा विरोधात आक्रमक पवित्रा घेताना असून खनिज उतख्तनाचा बांध फुटून खनिजयुक्त पाणी बागायतीत शेतीत गेल्याने कष्टाने उभी केलेली भात शेती तसेच बागायती नष्ट झाल्यात. त्यामुळे कळणे ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळावी अन्यथा आत्मदहन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram