Mahaparinirvan Din 2021 : येवला मुक्तीभूमीवर महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त आज येवल्याच्या मुक्तीभूमीवर त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सामाजिक,राजकीय नेत्यांनी मुक्तीभूमीवर जाऊन अभिवादन करत त्यांना पुष्पांजली अर्पण केली.येवल्यातील याच मुक्तीभूमीवर डॉक्टर बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती,कोविड च्या पार्श्वभूमीवर अनेकांना चैत्यभूमी वर जाता येत नसल्याने येवल्यातील बाबासाहेबांचे अनुयायांनी मुक्तीभूमीवर जात त्यांना आदरांजली अर्पण केली,नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाचे स्वीय सचिव बाळासाहेब लोखंडे यांच्या सह अनेक संघटनांचे पदाधिकारी,नगरपालिका प्रशासन,पोलीस अधिकारी,यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करत पुष्पांजली अर्पण केली,खरे तर येवला येथून अनेक जण चैत्यभूमी वर जात असतात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार कडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनुयायांनी आपल्या शहरातच महामानवाला आदरांजली वाहिली.