MPSCच्या पूर्वपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात केंद्र देण्याची मागणी, आमदार कपिल पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 20 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 घेण्यात येणार आहे. त्यासाठी काल एमपीएससीने काढलेल्या परिपत्रकामध्ये विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव पाहून त्या पार्शवभूमीवर जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये केवळ पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांपैकीच पुणे महसुली विभागाच्या बाहेरील जिल्हा / शहरामधील कायमस्वरूपी पत्ता नमूद असलेल्या उमेदवारांना त्यांच्या महसूल विभागाच्या मुख्यालयाच्या म्हणजेच मुंबई, नाशिक , औरंगाबाद, नागपूर व अमरावती केंद्र निवडण्याची यामध्ये मुभा देण्यात आली आहे. मात्र, आता यावर सुद्धा काही विद्यार्थ्यनी आक्षेप घेतल्यानंतर आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री, एमपीएससी अध्यक्ष यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांनी आधी निवडलेली परीक्षा केंद्र बदलून देऊन त्यांच्या स्वतः च्या जिल्ह्यात त्यांना सोयीचे होईल असे जिल्हा केंद्र द्यावीत अशी मागणी केली आहे.