Dr. Naresh Dadhich : डॉ. नरेश दधिच यांचे Beijing मध्ये निधन,वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Continues below advertisement
ज्येष्ठ सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि आंतर-विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्राचे (IUCAA) माजी संचालक डॉ. नरेश दधीच यांचे निधन झाले आहे. चीनमधील बीजिंग येथे एका परिषदेसाठी गेले असताना त्यांची प्रकृती खालावली आणि वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. डॉ. दधीच हे 'आयुका'च्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते आणि त्यांनी २००३ ते २००९ या काळात संचालक म्हणून काम पाहिले. गुरुत्वाकर्षण सिद्धांत आणि सापेक्षता या क्षेत्रातील त्यांच्या कामासाठी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जात होते. बीजिंगमध्ये एका महिन्याच्या संशोधन सहकार्यासाठी आणि व्याख्यानांसाठी गेले असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञान क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola