Odisha Tain Accident : रीलच्या नादात जीव गमावला, ओडीशातील पुरीतील धक्कादायक घटना
Continues below advertisement
ओडिशातील (Odisha) पुरी (Puri) येथे रेल्वे ट्रॅकवर रील (Reel) बनवताना एका १५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. विश्वजीत साहू (Vishwajeet Sahu) असे या तरुणाचे नाव असून, या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे. 'लोकांनी, विशेषतः तरुणांनी, हे लक्षात घेतले पाहिजे की काही सेकंदांचा व्हिडिओ त्यांच्या जीवापेक्षा मोलाचा नाही,' असा स्पष्ट इशारा सरकारी रेल्वे पोलीस (GRP) अधिकाऱ्यांनी दिला आहे. मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) जनकदेईपूर (Janakadeipur) स्टेशनजवळ ही दुःखद घटना घडली. विश्वजीत वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या जवळ रील शूट करत होता, पण त्याला वेगाचा अंदाज आला नाही आणि ट्रेनने त्याला धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पूर्व तटीय रेल्वेने (East Coast Railway) रेल्वे ट्रॅकवर रील किंवा व्हिडिओ बनवण्याविरोधात 'झिरो टॉलरन्स' (Zero-Tolerance) धोरण जाहीर केले असून, रेल्वे कायदा १९८९ अंतर्गत कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement