Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut : वॉररुममधून कार्यकर्त्यांची काम मॉनिटर करतो, संजय राऊतांना प्रत्युत्तर
Continues below advertisement
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या 'वॉर रूम' (War Room) वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही निशाणा साधला आहे. 'माझ्या पक्षात आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकविणारे संजय राऊत नाहीये', असे खळबळजनक विधान बावनकुळे यांनी केले आहे. भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांचे फोन आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर पाळत ठेवली जात असल्याचे विधान केल्याने वाद निर्माण झाला होता. यावर स्पष्टीकरण देताना बावनकुळे म्हणाले की, पक्षाच्या वॉर रूममधून केवळ कार्यकर्त्यांनी केलेले काम आणि पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या योजनांवर लक्ष ठेवले जाते. दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि महाविकास आघाडी (MVA) यांनी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत संयुक्त मोर्चाची घोषणा केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement