Amravati Skywalk : अमरावतीतील चिखलदरा येथील स्कायवॉकला केंद्राचा रेड सिग्नल

Continues below advertisement

अमरावतीच्या चिखलदऱ्याचं सौंदर्य स्कायवॉकच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आणण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नाना केंद्र सरकारने अडथळा आणला आहे. ज्या परिसरात स्कायवॉक बनतोय तो व्याघ्र अधिवसाचा भाग आहे असं सांगत चिखलदऱ्यात होणाऱ्या जगातील तिसरा आणि भारतातील पहिल्या स्कायवॉकला केंद्राने रेड सिग्नल दाखवला आहे. 

चिखलदरा परिसरात घनदाट जंगल असून हा परिसर वाघासहित इतर वन्य प्राण्यांचा अधिवास असल्याचं सांगत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उच्च दर्जाचे संवर्धन आणि संरक्षणाची आवश्यकता आहे असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ आणि स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफला एक पत्र पाठवलं असून त्या संबंधी प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला आहे.

इकोलॉजीकल स्टडी करा त्या प्रोजेक्ट्चा वन्यजीव अधिवासावर काही परिणाम होते का हे तपासा असही केंद्र सरकारच्या या पत्रात नमूद आहे. 

आता यावर सिडको लवकरच तज्ञांच्या समितीची निवड करुन त्यांच्याकडून अहवाल घेणार असल्याचं समजतंय. तज्ज्ञांचा या अहवालाच्या आधारे पुन्हा एकदा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram