Red Fort Security Lapse | लाल किल्ल्याच्या सुरक्षेत मोठी चूक, 7 पोलीस निलंबित!
पंतप्रधान दरवर्षी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. याच लाल किल्ल्याच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये एक मोठी त्रुटी उघड झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या Special Cell ने या किल्ल्यामध्ये Dummy Bomb घेऊन प्रवेश केला. मात्र सुरक्षा व्यवस्थेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली नाही. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणा समोर आला. सुरक्षा व्यवस्थेमध्ये हलगर्जी करणाऱ्या सात पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, सोमवारी पाच Bangladeshi नागरिक अवैधरित्या लाल किल्ल्यामध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनाही पकडण्यात आले आहे. या दोन्ही घटनांमुळे लाल किल्ल्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी काळात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यावर भर दिला जात आहे.