TAUKTAE : तोक्ते चक्रीवादळाचा वेग 200 किमी प्रतितासापर्यंत वाढण्याची शक्यता, सिंधुदुर्गात रेड अलर्ट

Continues below advertisement

तौक्ते चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आज सकाळपासून घोंगावत होते. रेडी ते विजयदुर्ग या 120 किलोमीटरच्या जिल्ह्यातील किनारपट्टीसह जिल्ह्यात सर्वच भागात  चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील 70 ते 80 घरांचे नुकसान झाले असून अजूनही जिल्ह्यात 60 ते 70 किमी वेगाने वारे वाहत आहेत. जिल्ह्यातील अनेक मार्ग झाडं पडल्यामुळे बंद आहेत. तर घाटमाथ्याला जोडणारा आंबोली घाटात झाड व दरडी कोसल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. जिल्ह्यात 100 ते 110 घरांचे नुकसान झाले असून अजूनही जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वादळ घोंगावत आहे. उद्याही जिल्ह्यात किनारपट्टी भागात वादळी वारे व समुद्र खवळलेला राहील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram