रत्नागिरी, रायगडसाठी रेड अलर्ट, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, मुंबई, ठाण्यासाठी उद्या ऑरेजं अलर्ट
Continues below advertisement
मुंबईसह उपनगरात गेल्या तासाभरापासून पाऊस कोसळत आहे. गेले काही दिवस मुंबईत पावसाने उसंत घेतली होती मात्र आज मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे मुंबईमधील सखल भागात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे. याचा परिणाम रस्त्यावरील वाहतुकीवर होताना दिसतो आहे. घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर असल्फा मेट्रो स्थानक ते साकीनाका मेट्रो स्थानकच्या रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर या ठिकाणी दोन ते तीन फूट पाणी आहे.या मुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे.
Continues below advertisement