Sanjay Mandlik: संजय मंडलीक शिंदे गटासोबत जाण्याची कारणं ABP Majha

Continues below advertisement

एकनाथ शिंदे गटाविरोधात रस्त्यावर उतरणारे शिवसेनेचे पहिले खासदार संजय मंडलिक देखील आता शिंदे गटात  सामील होणार असल्याची शक्यता आहे. संजय मंडलिक एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचं जवळपास निश्चित असल्याची चर्चा कोल्हापुरात रंगली आहे. काही दिवसांपूर्वीचं मंडलिक यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. सेनेतून गेले ते बेंटेक्स आणि राहिले ते 24 कॅरेट सोनं, अशी टीका मंडलिक यांनी केली होती. मात्र, तेच मंडलिक देखील आता शिंदे गटात सहभागी होण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जातंय. कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे  शिंदे गटात सहभागी झाले, असं कारण मंडलिक देऊ शकतात, अशीही माहिती मिळतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram